आ . अतुल भातखळकरांची शरद पवारांवर टीका

मुंबई : वृत्तसंस्था । खासदार संभाजीराजे छत्रपती आणि छत्रपती उदयनराजे हे दोन्ही छत्रपती भाजपाच्या पाठिंब्यावर राज्यसभेत गेले आहेत. तेव्हा त्यांनी केंद्राच्या मदतीने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा आणि त्यासाठीच्या आंदोलनाचं नेतृत्वही करावं, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं. यावरून भाजपा नेते आणि आमदार अतुल भातकळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

“भाजपच्या मदतीने खासदार झालेल्या दोन्ही छत्रपतींनी भाजपच्या केंद्र सरकारकडून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा असं शरद पवार म्हणाले. मराठा आरक्षणाबाबत भाजपा कटिबद्ध आहेच. आम्ही शर्थीने प्रयत्न करू. पवारांना हे झेपणारही नाही, कारण ते कोलांट्या मारण्याइतके सोपे नाही,” असं भातखळकर म्हणाले. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीट करून आपली त्यांच्यावर निशाणा साधला.

मराठा समाजाच्या विविध संघटनांकडून आंदोलने सुरू आहेत. या लढ्यात तयार झालेले गट-तट आणि नेतृत्वाच्या मुद्दय़ावरूनही विविध मतमतांतरं होत असल्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस असलेल्या संभाजीराजे आणि उदयनराजे यांनीच पुढाकार घेण्याची मागणी पुढे येत आहे.

Protected Content