नागरिकत्व दुरुस्ती कायदा संदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

नवी दिल्ली वृत्तसंस्था । नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला आव्हान देण्यात आलेल्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात आज सकाळी 11.30 वाजता या याचिकांवर सुनावणी होणार आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात एकूण 59 याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत.

या सर्व याचिकांवर सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांचं घटनापीठ सुनावणी करणार आहे. याचिकाकर्त्यांमध्ये काँग्रेस नेते जयराम रमेश, एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी, तृणमूल काँग्रेसचे नेते महुआ मोईत्रा, राजदचे मनोज झा, जमीयत उलेमा ए हिंद, इंडियन मुस्लीम लीग यांचा समावेश आहे. याचिकाकर्त्यांनी धर्माच्या आधारावर शरणार्थींना देशाचं नागरिकत्व देण्याला विरोध केला आहे आणि हे भारतीय घटनेच्या विरोधात असल्याचं म्हटलं आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला स्थगिती मिळावी असा याचिकाकर्त्यांना प्रयत्न असणार आहे.

 

Protected Content