चोपडा प्रतिनिधी । येथील ललित कला केंद्रातर्फे एटीडी फाऊंडेशन, जी.डी. आर्टच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी “शैक्षणिक साहित्य निर्मिती व उपयोग” याविषयी नुकतेच कार्यशाळा उत्साहात पार पडली.
या कार्यशाळेत कटपुतली बाहुलीकार आंतरराष्ट्रीय पातळीवरील सतत तीन वेळेस निवड झालेले व पारंपारिक बाहुली कठपुतळी साठीचे एकमेव विजेता ठरलेले चोपडा येथील प्रा.दिनेश साळुंखे हे मार्गदर्शक म्हणून होते. सतत ध्यास आणि गुरूंचे मार्गदर्शन त्यामुळे आपल्याला वाटेल ती उंची गाठता येते. पतपेढी पेक्षा आपण बँक होणेच पसंत करावे. म्हणजे आपल्या ज्ञानाचा भरपूर प्रमाणात प्रसार करता येतो. तसेच शैक्षणिक साहित्य यांविषयी निर्मिती आणि त्यांचे विविध प्रकारे उपयोग यावर हसत-खेळत माहिती दिली. अतिशय अल्प खर्चात आणि सोप्या पद्धतीत आपण शैक्षणिक साहित्य कसे निर्माण करू शकतो. याचे प्रात्यक्षिकही दिले. यामध्ये क्षणचित्रे घडी चित्रे, चलचित्रे, मॅजिक फोल्डर, मॅजिक बॉक्स कल्प फलक, संच त्रिमिती चित्र, डायमंड शेप इत्यादी असे अनेक साहित्य कौशल्य पूर्वक निर्मितीवर प्रकाश टाकला. तसेच प्रत्यक्षपणे विद्यार्थ्यांकडून आकृतीसह नमुने देखील करून घेतले.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
या शैक्षणिक साहित्याचा अध्यापनात वेळेची बचत करमणूक तसेच स्मरण शक्तीत चालना देणे आणि विद्यार्थ्यांना कसे खेळवून ठेवता येते. हे स्पष्ट केले तसेच या साहित्य निर्मिती द्वारा रोजगारही उपलब्ध होतो याची जाणीव करून दिली. याप्रसंगी प्राध्यापक संजय नेवे यांनी प्रास्ताविक व परिचय करून दिला. तर ज्येष्ठ प्राध्यापक जी.व्ही. साळी यांनी प्रा.दिनेश साळुंखे यांचे पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. तर प्राचार्य राजेंद्र महाजन यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.सुनिल बारी, प्रा.विनोद पाटील, तसेच लिपीक भगवान बारी,सेवक अतुल अडावदकर, प्रविण मानकरी यांनी सहकार्य केले.