नाभिक बांधवांना शासनाने मदतीपासून वंचित ठेवल्याने भडगावात मुंडन आंदोलन

 

भडगाव, प्रतिनिधी  ।  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने लॉकडाऊन जाहीर केले. मात्र शासनाने इतर घटकांना  मदत जाहीर करत नाभिक समाजाला आर्थिक मदतीपासुन वंचित ठेवल्याने शहर व तालुक्यातीलनाभिक बांधवानी गिरणा नदी पात्रात मुंडन आदोलंन करून शासनाचा निषेध व्यक्त केला.

महाराष्ट्र शासनाने नुकताच जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये सर्व प्रथम सलुन, पार्लर व्यवसाय बंद केला आहे. मागिल लॉक डाऊन वेळी देखील हीच स्थिती होती. लॉकडाऊनमुळे नाभिक समाज बांधवावर उपासमारीची वेळ आली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लॉक डाऊन  जाहीर करताना नाभिक समाज बांधवाना मदत जाहीर करतील अशी अपेक्षा होती. इतर व्यसायधारकांना मदत जाहीर करताना शासनाने नाभिक समाजाला मदत देण्यासाठी चकार शब्द देखिल काढला नाही. तसेच मागिल वर्षी देखील लॉक डाऊनमुळे व्यवसाय बंद असल्याने खचुन जात समाज बांधवानी आत्महत्या केल्या आहेत. यावर्षी देखील चोपडा तालुक्यातील वैजापुर येथे गणेश सैदाणे, उस्मनाबाद येथे मनोज झेडे यांनी आत्महत्या केली आहे. त्याच्या वारसाना शासनाने मदत जाहीर केली नाही. लॉक डाऊनमुळे प्रभावीत इतर घटकाना शासन मदत देत असताना नाभिक समाजाला मदत न देणे हा नाभिक समाजावर अन्याय आहे. नाभिक समाजाने कीती कीती अन्याय सहन करायचा; या संतापाचा उद्रेक होऊन शहर व तालुक्यातील नाभिक समाज बांधव यांनी मुंडन करुन शासनाकडे आपला संताप व्यक्त केला आहे. यावेळी नाभिक समाज बांधव यांनी आपले मुंडन करत केले. याच पध्दतीचे आंदोलनात भडगाव तालुक्यातील कजगाव, गोंडगाव आमडदे, गिरड, कोळगाव सह इतर गावातील सर्व समाज बांधव सहभागी झाले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डीस्टीगशन पाळत, मास्क, सॅनिस्टाझरचा वापर करत शासना विषयी संताप व्यक्त करण्यात आला.

याप्रसंगी  नाभिक समाज मंडळाचे अध्यक्ष संजय पवार, उपाध्यक्ष भरत चव्हाण, सचिव हिलाल नेरपगारे, खजिनदार विजय ठाकरे, कार्यकारणी सदस्य काशिनाथ शिरसाठ, शिवाजी शिरसाठ, राजेद्र सोनवणे, प्रभाकर नेरपगारे, सुभाष ठाकरे, निलेश महाले, राजु महाले, गोरख वेळीस, कैलास चव्हाण, नारायण नेरपगारे, दिलीप वेळीस, अरुण पवार, बापु महाले, नामदेव चव्हाण, अनिल नेरपगारे, नितिन शिरसाठ, विजय चव्हाण, दिपक शिरसाठ, सुर्यभान वाघ, संजय शिरसाठ, सुभाष चव्हाण, भगवान नेरपगारे, तुळशिदास निकम, नाना चव्हाण, राजु शिरसाठ, नंदु ठाकरे, सागर मोरे, राजु सोनवणे, भिका शिरसाठ, भास्कर पवार, राम नेरपगारे, कीशोर निकम, भगवान चव्हाण मनोज सैदाणे, संतोष चव्हाण विठ्ठल शिरसाठ सह सर्व समाज बांधव उपस्थित होते.

 

Protected Content