नागपूर प्रतिनिधी । विदर्भाच्या संघाने आज सौराष्ट्रचा दणदणीत पराभव करून लागोपाठ दुसर्या वर्षी रणजी चषक काबीज केला आहे.
विदर्भाने विजयासाठी दिलेल्या २०६ लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्या दिवसअखेर सौराष्ट्रची ५ बाद ५८ अशी स्थिती होती. सौराष्ट्रला विजयासाठी १४८ धावांची गरज होती. तर विदर्भाला पाच विकेटस हव्या होता. आज सकाळी खेळ सुरू झाल्यानंतर विदर्भाच्या संघाने अवघ्या दीड तासांमध्ये सौराष्ट्रचे उर्वरित गडी तंबूत पाठवून विजय साकार केला. या माध्यमातून विदर्भ संघाने लागोपाठ दुसर्या वर्षी रणजी चषकावर आपले नाव कोरले. प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी विदर्भाच्या संघावर मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली असून याचे फळ लागोपाठ दुसर्या वर्षी विजेतेपदाच्या माध्यमातून मिळाल्याचे मानले जात आहे.