Home राष्ट्रीय मोदीच पुन्हा सत्तेवर येणार-झुनझुनवाला

मोदीच पुन्हा सत्तेवर येणार-झुनझुनवाला

0
48

मुंबई प्रतिनिधी । विख्यात गुंतवणूकदार गुरू राकेश झुनझुनवाला यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी हे जास्त जागा घेऊन जिंकणार असल्याचे वक्तव्य केले आहे.

एका परिषदेत बोलतांना राकेश झुनझुनवाला यांनी नरेंद्र मोदी यांच्या विजयाचे भाकित केले आहे. यात ते म्हणाले की, भाजपा आगामी निवडणुकीत सर्वांना आश्‍चर्याचा धक्का देईल. स्वातंत्र्यानंतर प्रत्येक दशकात भारताचा विकास दर उंचावला. व्यवस्थेत जेव्हा उलथापालथ होते तेव्हाच विकास आणि समृद्धी होते, भारत आणि अमेरिकेत असंच झाले होते, असे त्यांनी सांगितले. भारताच्या विकासात लोकशाही, उद्यमशीलता आणि नैसर्गिक संपत्ती याचे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले. २०१९ मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकांबाबत भविष्यवाणी करणं कठीण आहे, मात्र यात मोदीच पुन्हा बाजी मारणार असल्याचा दावादेखील झुनझुनवाला यांनी केला.

राकेश झुनझुनवाला हे दलाल स्ट्रीटवरील बडे प्रस्थ म्हणून गणले जाते. यामुळे त्यांच्या वक्तव्याला महत्व प्राप्त झाले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound