Home Cities जळगाव जळगावात अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच

जळगावात अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच

0
104


जळगाव प्रतिनिधी । महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकातर्फे आज सलग दुसर्‍या दिवशीदेखील अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू ठेवण्यात आली आहे.

काल तांबापुरा भागातील अतिक्रमण काढण्यात आले होते. प्रारंभ येथे वाद होऊन थोडा तणाव पसरला होता. मात्र चोख पोलीस बंदोबस्तामुळे येथे अतिक्रमण काढण्यात आले. दरम्यान, आज सकाळपासून याच परिसरातील अतिक्रमण हटाव मोहीम सुरू ठेवण्यात आली आहे. आजदेखील कोणताही अनुचीत प्रकार होऊ नये म्हणून बंदोबस्त लावण्यात आला आहे. जेसीबीच्या सहाय्याने महापालिका कर्मचार्‍यांनी अतिक्रमीत पध्दतीत बांधण्यात आलेल्या भिंती, ओटे, धापे तोडण्यास प्रारंभ केला आहे. आज दिवसभर ही मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound