Home राजकीय राज्यपालांनी कमी वेळ दिला याची खंत : उद्धव ठाकरे

राज्यपालांनी कमी वेळ दिला याची खंत : उद्धव ठाकरे

udhav
udhav


 

udhav
 

मुंबई (वृत्तसंस्था) आपण अविश्वसनीय करुन दाखवणार. तसेच राज्यपालांनी कमी वेळ दिला याची खंत असल्याची प्रतिक्रिया पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी लिलावती रुग्णालयात गेले होते. यानंतर तेथून निघताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आले होते. राऊत यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देतांना आपण अविश्वसनीय करुन दाखवणार, अशी प्रतिक्रिया दिली. एवढेच नव्हे, तर राज्यपालांनी कमी वेळ दिला याची खंतही ठाकरे यांनी बोलून दाखवली. दरम्यान, याआधी शिवसेना नेते संजय राऊत यांनीही ट्विट करत, राज्यपालांनी भाजपाला ७२ तास आणि शिवसेनेला फक्त ४८ तासांची मुदत दिल्याची सांगत कमी वेळ दिल्याची खंत व्यक्त केली होती.


Protected Content

Play sound