मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेला त्यांचा मुख्यमंत्री बनविण्याची एक चांगली संधी आहे. फक्त आता उद्धव ठाकरे किती हिंमत दाखवतात त्यावर अवलंबून आहे की, त्यांचा मुख्यमंत्री होणार की नाही, असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आजच्या संपूर्ण राजकीय परिस्थितीबाबत भाष्य केले आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, शिवसेनेला एक चांगली संधी आहे त्यांचा मुख्यमंत्री बनविण्याची. फक्त आता उद्धव ठाकरे किती हिंमत दाखवतात त्यावर अवलंबून आहे की, त्यांचा मुख्यमंत्री होणार की नाही. यासाठी शिवसेनेने ठाम भूमिका घेऊन सांगितले पाहिजे की, जोवर मुख्यमंत्रिपद देत नाही तोवर सत्ता सहभागी होणार नाही. मग चालवा आपले सरकार. जर शिवसेनेने शेवटपर्यंत आपली मागणी लावून धरली तर मात्र भाजप त्यावर गंभीरपणे विचार करु शकते.’ असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे. परंतू दुसरीकडे भाजपने शिवसेनेशिवायच शपथविधी सोहळ्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे भाजप देखील आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे चित्र आहे.