भुसावळ, प्रतिनिधी | सिने अभिनेता गोविंदा यांचे आज (दि१९) येथील रेल्वे स्थानकावर अचानक आगमन झाल्याने स्थानकावरील प्रवाशांनी व नागरिकांनी गोविंदा यांच्या सोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली होती.
भुसावळ स्थानकावर अचानकपणे गोविंदा यांचे आगमन झाल्याने त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे जाण्यासाठी म्हणुन रेल्वेने ते भुसावळ स्थानकावर उतरले होते. काही मिनिटातच स्टेशनच्या बाहेर येवून ते एका कारने मलकापूरकडे रवाना झाले.