फैजपूर प्रतिनिधी । धनाजी नाना महाविद्यालय येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत ‘आंतर महाविद्यालयीन मैदानी स्पर्धा’ आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत जवळपास 30 महाविद्यालयातील पुरुषांसह महिला खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी डॉ.ए.बी. चौधरी यांनी मनुष्याला दैनंदिन जीवन जगताना मूलभूत हालचाली करणे आवश्यक असून आणि त्या हालचाली म्हणजेच चालणे, पळणे, फेकणे आणि उड्या मारणे ह्या आहेत. त्यांच्याच स्पर्धा असल्यामुळे मला विशेष आनंद वाटतो. सुखी आणि आनंदी जीवनासाठी या मूलभूत हालचाली करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने या हालचालींचा समावेश जीवनात करणे आवश्यक आहे. त्यामुळेच प्रत्येक व्यक्ती निरोगी आणि आनंदी जीवन जगू शकतो. त्याकरिता प्रत्येकाने याचा सराव करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समारोप करताना प्रा.डॉ.पी.आर चौधरी यांनी महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या क्रीडा विभागामार्फत सोयीसुविधा बद्दल माहिती दिली. तसेच या सर्व सोयी-सुविधांचा लाभ विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व खेळाडूंनी घ्यावा असे आवाहन केले.
स्पर्धेचे आकर्षण
स्पर्धेचे मुख्य आकर्षण राहिलेले धनाजी नाना महाविद्यालयाचे खेळाडू म्हणजे तालीब पिंजारी या खेळाडूने लांबउडी, उंचउडी शुभम मोरे याने तिहेरी उडी आणि हातोडा फेक, कुंभारे मयुर याने थाळीफेक, तायडे भूषण याने थळीफेक आणि हातोडा फेक, धीरज कोळी बांबु उडी आणि महिला क्रीडाप्रकारात लक्ष्मी बोंडे या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली.
स्पर्धेचे विजेते खेळाडू
मैदानी स्पर्धेत सर्वसामान्य विजेतेपद व्ही.एस.नाईक महाविद्यालय रावेरने प्राप्त केले तर पुरुष प्रकारात आयोजक महाविद्यालय धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर उपविजयी राहिले. मु.जे महाविद्यालय जळगाव पुरुष आणि महिला प्रकारात तिसऱ्या क्रमांकावर राहिले. महिलांमध्ये नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव उपविजयी ठरले या स्पर्धेत पंच म्हणून प्राध्यापक बी.एल.पाटील, प्रा.किशोर पाठक, प्रा.सुभाष वानखेडे यांनी कार्य केले. तसेच तांत्रिक समितीचे सदस्य म्हणून डॉ.संजय चौधरी आणि डॉ.पी.आर.चौधरी यांनी काम पाहिले.
कार्यक्रमात विशेष उपस्थिती
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी तर प्रमुख पाहुणे डॉ.ए.बी चौधरी, अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, प्राध्यापक नितीन बारी, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य, डॉ.बी.पी.पाटील, परीक्षा नियंत्रक, आर.पी.पाटील, उपकुलसचिव, प्राध्यापक डॉ.के.जी.कोल्हे, सिनेट सदस्य, प्राध्यापक डॉ.अविनाश बडगुजर, सचिव, एन मुक्ता संघटना, एस.बी.हातागडे कक्षाधिकारी, अनिल आर.वाणी वरिष्ठ सहाय्यक, उपप्राचार्य प्राध्यापक डॉ.अनिल भंगाळे, उपप्राचार्य प्रा.डॉ.उदय जगताप, उपप्राचार्य प्रा.अनिल सरोदे, उपप्राचार्य प्रा.दिलीप तायडे, प्रा.डॉ.सतीष चौधरी, चेअरमन, जिमखाना समिती प्रा.डॉ.पी.आर चौधरी, सचिव जळगाव विभाग प्रा.डॉ.बी.एल पाटील, माजी क्रीडा संचालक प्रा.डॉ.किशोर पाठक, प्रा.वाय.डी.देसले, प्रा.सतीश कोकटा, प्रा.संजय चौधरी, प्रा.मुकेश पवार, प्रा.डॉ.आनंद उपाध्याय, प्रा.नीलिमा पाटील, प्रा.महेश पाटील, प्रा.सुभाष वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी सहकार्य
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवराज गाढे, आर.डी.ठाकुर, प्रकाश भिरूड, कन्हैया फेगडे, पंकज मोरे, तुषार सपकाळे, अलाउद्दीन तडवी, धम्मदीप मेघे, योगेश महाजन, अतुल महाजन आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सतीश चौधरी यांनी केले व सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ.गोविंद मारतळे यांनी केले व आभार प्राध्यापक दिलीप बोदडे यांनी मानले.