धरणगाव, प्रतिनिधी | येथील प्रभाग क्रमांक ७ मध्ये आज (दि.१४) सायंकाळी ५.०० वाजता महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रचाराला लांडगे गल्ली येथून सुरवात झाली. यावेळी प्रभागाचे नगरसेवक वासुदेव चौधरी, आराधना पाटील, माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील, महिला शहर प्रमुख रत्नाबाई धनगर व मैनाबाई यांच्या नेतृत्वाखाली विजय संकल्प रॅली काढण्यात आली.
ही रॅली बेलदार गल्ली, एम.व्ही. चौक, गुजराती गल्ली, परिहार चौक, परिहार नगर या परिसरातील नागरिकांनी रॅलीला प्रतिसाद दिला. वासुदेव चौधरी यांनी ना. पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी केले. रॅलीत प्रभाग क्रमांक ७ मधील शिवसेनेचे सगळे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.