Home Cities जळगाव बंगालमधील हत्याकांडातील कुटुंबाला उद्या जळगावात श्रद्धांजली

बंगालमधील हत्याकांडातील कुटुंबाला उद्या जळगावात श्रद्धांजली

0
31

 

जळगाव, प्रतिनिधी | पश्चिम बंगाल राज्यात पती, पत्नी आणि ६ वर्षीय बालकाचे निर्घुण हत्याकांड घडून आले आहे. याचा निषेध करण्यासाठी आणि मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबाला शहरात शनिवारी १२ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६.३० वाजता काव्यरत्नावली चौक येथे श्रद्धांजली वाहण्यासाठी जळगावकर नागरिक एकत्र जमणार आहेत.

बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते प्रकाश पॉल, त्यांच्या गर्भवती पत्नी आणि ६ महिन्यांचा निष्पाप मुलगा यांची अज्ञात मारेक-यांनी निर्घूण हत्या केली. घटना जेवढी चीड आणणारी आहे तेवढीच विकृत मानसिकतेचा निषेध करणारी आहे. पॉल कुटुंबाला श्रद्धांजली वाहण्यासाठी जळगावकर नागरिकांनी, विविध सामाजीक संघटनेच्या प्रतिनिधींनी संध्याकाळी वेळेवर उपस्थिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound