जळगावात रा.कॉ.चे अभिषेक पाटील यांनी साधला नागरीकांशी संवाद

prachar sabha abhishek

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहर मतदार संघाचे राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांनी गावातील शनीपेठसह इतर भागात महिला मतदारांशी असलेल्या समस्या जाणून घेत सेवेची संधी मिळाल्यास संधीचे सोने करेल असे आश्वासन दिले. अभिषेक पाटील यांनी शहरात जोरदार प्रचार सुरु केला आहे. संपूर्ण शहरात ते पायी फिरून लोकांच्या अडी-अडचणी जाणून घेत आहेत.

त्यांचे नागरिकांकडून ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत असून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. शहराच्या विविध भागांमध्ये फिरून ते मतदारांच्या समस्या जाणून घेत आहेत. तसेच त्यांचे निवारण करण्याचे आश्वासनही देत आहेत. यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख लीलाधर तायडे, नामदेव चौधरी, डॉ. नितीन पाटील, गफ्फार मलीक यांच्यासह आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content