भुसावळ प्रतिनिधी । दिवंगत मामा बियाणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आजपासून शहरात क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ झाला असून सकाळी याचे उदघाटन करण्यात आले.
मामा बियाणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन माहेश्वरी समाज, तहसील सभा आणि युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून याला बियाणी एज्युकेशन समूहाने प्रायोजित केले आहे. शहरातील बियाणी मिल्ट्री स्कूलच्या प्रांगणावर या स्पर्धा खेळविण्यात येत आहेत.
आज सकाळी सात वाजता या स्पर्धेचे उदघाटन बियाणी एज्युकेशन समूहाचे अध्यक्ष मनोज बियाणी यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी संगीता बियाणी, माहेश्वरी समाज अध्यक्ष राधेश्याम लाहोटी, तहसील सभा अध्यक्ष संजय लाहोटी, महिला मंडळाच्या श्रीमती अयोध्यादेवी मंत्री, मयूर नागोरी, यश हेडा, प्रेमराज लढ्ढा. चेतन भटाडिया, महेश हेडा, चंद्रकांत मंत्री आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मामा बियाणी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. मनोज बियाणी यांनी आपल्या मनोगतातून मामा बियाणी यांच्या आठवणींना उजाळा देत ते विविध क्रीडा स्पर्धांना मदत करत असल्याचे सांगितले. या स्पर्धेतील विविध विजेत्यांना आकर्षक पारितोषीके देण्यात येणार आहेत. यात जिल्हाभरातील संघांनी भाग घेतला आहे.