जळगाव प्रतिनिधी । शहरातील एसएमआयटी महाविद्यालयाच्या प्रांगणात परिवर्तन महोत्सवास प्रारंभ झाला असून सुरवातीला नली हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला.
माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तीन दिवसीय परिवर्तन महोत्सव आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या उदघाटनाला आमदार राजूमामा भोळे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, रवींद्रभैया पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. महोत्सव प्रमुख अंजली पाटील यांनी महोत्सवाची संकल्पना मांडली. या वेळी संगीता राजेनिंबाळकर, प्रा. एन. डी. पाटील, अपर्णा भट, ज्योती चव्हाण, मयूर कापसे, गजानन देशमुख, संदेश भोईटे, डॉ. राधेश्याम चौधरी, ज्ञानेश्वर मोरे, दुर्गेश पाटील उपस्थित होते. रंगकर्मी मंजूषा भिडे यांनी सूत्रसंचालन केले. राहुल निंबाळकर यांनी आभार मानले. महोत्सवात प्रारंभी हर्षल पाटील यांनी नली हे एकलनाट्य सादर केले.
दरम्यान, परिवर्तन महोत्सवामध्ये आज अमृताहूनी गोड हा कार्यक्रम होणार असून यात अभंग, गवळण, कविता, गाणी, लावणी असा संगीतमय प्रवास कलाकार उलगडणार आहेत. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर, पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे, जे. के. चव्हाण यांची उपस्थित राहणार अहेत.