रावेर , प्रतिनिधी | प्रखर हिंदुत्वाचे प्रतिक, भाजपची मुलुख मैदानी तोफ उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गुरुवार १० ऑक्टोबर रोजी महायुतीचे उमेदवार हरिभाऊ जावळे यांच्या प्रचारासाठी येत आहेत.
भाजपा-शिवसेना-रासप-रिपाई-रयतक्रांती-शिवसंग्राम महायुतीचे रावेर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार ना. हरिभाऊ जावळे ह्यांच्या समर्थनार्थ विराट “विजय संकल्प सभा” आयोजित करण्यात आली आहे. गुरुवार, १० ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता बऱ्हाणपूर रोड वरील छोरिया मैदानात या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी व रावेर विधानभेतील सर्व मतदार बंधू भगिनींनो हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.