जिल्हा बँकेत महाविकास आघाडीने आमच्यासोबत दगा केला- गिरीश महाजन  

रावेर,प्रतिनिधी| जिल्हा बँकेच्या सर्वपक्षीय पॅनल संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत बोलूनही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ऐनवेळी आपली भूमिका बदल्यामुळे आमच्या सोबत दगा-फटका केल्याची घणाघाती टोला माजी मंत्री गिरीष महाजन यांनी रावेर येथे लगावला आहे.

माजी मंत्री गीरीश महाजन हे  मध्य प्रदेशात भाजपाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जात असताना आगामी निवडणुकांविषयी चर्चा करण्यासाठी त्यांनी आज रावेर येथे धावती भेट दिली. त्यावेळी जिल्हा बँकेच्या सर्वपक्षीयाच्या नावाखाली आमच्या सोबत दगा-फटका केला. ऐनवेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ऐनवेळी बदलल्यामुळे हे सर्व घडले आहे. अशी घणाघाती टीका त्यांनी यावेळी केला. तसेच मी स्वत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत सर्वपक्षीय पॅनल संदर्भात बोललो. परंतु त्यांनी आपली भूमिका बदलली. हे सर्व जिल्हातील झारीच्या शुक्राचार्यमुळे घडल्याचे माजी मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.

यावेळी नगरसेवक सुधीर पाटील यांनी आगामी पालिकेची निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन भाजपात प्रवेश केला. यावेळी जि. प. सदस्य नंदकिशोर महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, भाजपा सरचिटणीस महेश चौधरी, भाजपाचे संदीप सावळे, पंचायत समिती सदस्य पि. के. महाजन, भाजपा शहराध्यक्ष दिलीप पाटील, नगर सेवक यशवंत दलाल व  पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content