नवी दिल्ली प्रतिनिधी । भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) क्रिकेट सल्लागार समितीचा (सीएसी) राजीनामा दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कपिल यांनी सीएसी प्रमुखपदाचा आपला राजीनामा पाठवला आहे. ही समिती समाप्त झाल्याची घोषणा प्रशासक समितीने (सीओए) करायला हवी होती. कारण या समितीच्या स्थापना केवळ मुख्य प्रशिक्षकपदाच्या निवडीसाठीच केली गेली होती. त्यामुळे दिग्गज खेळाडूंवर असे हितसंबंधांचे आरोप लागत आहेत, ते लागले नसते. कपिल देव यांनी ईमेलद्वारे आपल्या राजीनाम्याचा निर्णय बोर्डाला कळवला. दुहेरी हितसंबंधाच्या तक्रारीवरून बीसीसीआयचे लोकपाल डी.के.जैन यांनी त्यांना नोटीस पाठवली होती.