पहूर येथे महावीर पब्लीक स्कुलमध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

WhatsApp Image 2019 10 02 at 4.21.53 PM

पहूर ता. जामनेर, प्रतिनिधी | आज पहूर येथील महावीर पब्लिक स्कूलचा वर्धापनदिन, महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती, शिक्षक पालक मेळावा आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दलित मित्र मोरसिंग राठोड हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून रामेश्वर पाटील, उपसरपंच श्याम सावळे, महावीर पब्लीक स्कुलचे चेअरमन प्रदीप लोढा, सेक्रेटरी सचिन पाटील, पहूर पोलिस स्टेशनचे एपीआय राकेश परदेशी, किरण बर्गे, जि.प. सदस्या प्रमिलाबाई पाटील, पं. स. सदस्या पुजा भडांगे, माजी उपसरपंच रवींद्र मोरे, ग्रा.पं.सदस्य शरद पांढरे, ईश्वर बारी, चांदखा तडवी, तसेच किरण पाटील, विवेक जाधव, सुकलाल बारी, तेजराज जैन, दिपक लोढा, मिनाज शेख, राजू पठाण, इरफान शेख, अशोक जाधव आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते भगवान महावीर, सरस्वती माता, महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री, कै. कृषी पंडित मोहनलाल लोढा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच शाळेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा व शाळेतील सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका सुनंदा कुलकर्णी, उपमुख्याध्यापिका कंडारे मॅडम, चव्हाण सर व असिफ सर यांचेसह सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी कामकाज पहिले.

Protected Content