पुणे प्रतिनिधी । शहरात बुधवारी रात्री अवघ्या दोन-अडीच तासांत ढगफुटीसदृश पाऊस झाला असून या पावसाच्या थैमानात दक्षिण पुण्यात भिंत कोसळून 6 जणांचा आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने शहरासह जिल्ह्यात १९ नागरिकांना जीव गमवावा लागला. ती ९ जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे.
याबाबत अधिक अशी की, जान्हवी जगन्नाथ सदावर (वय ३५), श्रीतेज जगन्नाथ सदावर (वय ८), संतोष महादेव कदम (वय ५५), रोहित भास्कर आमले (वय १४), लक्ष्मीबाई शंकर पवार (वय ६९), वंदना विकास अतितकर (वय ५०), ज्योत्स्ना संजय राणे (वय ३३), अमृता आनंद सुदामे (वय ३७), किशोर दत्तात्रेय गिरमे (वय ५४), मच्छिंद्र पांडुरंग बवले (वय ४२), सुमन अदिनाथ शिंदे (वय ६६), नागराज बाळकृष्ण भिल्ल (वय २२), धर्मनाथ मातादिन भारतीप्रसाद (वय २५), गौरी शाम सूर्यवंशी (वय १४), साईनाथ सोपान भालेराव (वय ३५), राजेंद्र विठ्ठल राऊत (वय ५०), छकुली अनंता खोमणे (वय २२),गजराबाई सुदाम खोमणे (वय ७) आणि तृतीयपंथी (नाव पत्ता उपलब्ध नाही) असे मृत व्यक्तींचे नावे असून मृतांची संख्येत वाढ होण्याचे संकेत आहेत. ओढे-नाल्यांलगतच्या अतिक्रमणांमुळे पाण्याने रौद्ररूप धारण केले. त्यात अनेक वाहने वाहून गेली. महापालिका आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने (एनडीआरएफ) केलेल्या बचावकार्यात गुरुवारी तीन हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.