मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून ३७ हजरांचा ऐवज लंपास

 

भुसावळ, प्रतिनिधी । शहरातील मुन्ना तेली यांच्या घराजवळ लक्ष्मी नगर भागातील अज्ञात चोरट्यांने मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून ३७,००० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी इकरामुल हक मोनिस खान राहणार मुन्ना तेली यांच्या घराजवळ लक्ष्मी नगरमध्ये अजीज ठेकेदार यांचे स्वतःचे व फिर्यादी राहत असलेल्या भाड्याच्या घरात दिनांक १६ मार्च २०२० रोजी रात्री १० वाजेच्या सुमारापासून ते १९ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीवाचून घरातील एल.ई.डी टीव्ही,चांदीच्या वाट्या,चांदीचे पायल,सोन्याच्या अंगठ्या,नाकातील फुली,कानातील सोन्याच्या रिंग असे एकूण ३७,००० किंमतीच्या वस्तू कोणीतरी अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इरादयाने चोरून नेले. म्हणून बाजारपेठ पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १९ ऑक्टोबर रोजी ७.३० वाजेला गुरुन ८९५ /२०२० भा.द.वि.कलम ४४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोना तेजस पारीसकर करीत आहे.

Protected Content