आता फडणवीसही म्हणताय…’लाव रे तो व्हिडिओ’ !

 

उस्मानाबाद वृत्तसंस्था । राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना त्यांच्या जुन्या मागण्यांचे व्हिडिओ दाखवून त्या पूर्ण करण्याची मागणी केली आहे. आज उस्मानाबाद येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडताना त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी एक व्यापक प्रमाणात केंद्र सरकार विरुद्ध मोहीम चालवली होती. यात त्यांनी म्हटलेले ‘लाव रे तो व्हिडिओ’ हे वाक्य तुफान लोकप्रिय झाले होते. या माध्यमातून राज ठाकरे यांनी मोदी सरकारने आधी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देत त्यांनी ही कामे केली नसल्याचे दाखवून दिले होते. यामुळे ‘लाव रे तो व्हिडिओ’ हे वाक्य राजकारणामध्ये प्रचलित झाले होते. आता राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील हाच पॅटर्न अमलात आणण्याचे संकेत दिले आहेत. आज उस्मानाबाद येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. याप्रसंगी फडणवीस म्हणाले की राज्य सरकार हे निव्वळ शो बाजी करत आहे शेतकऱ्यांना कोणतीही ठोस मदत जाहीर केली जात नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. याप्रसंगी त्यांनी आपण राज्य सरकारमधील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व अन्य नेत्यांना त्यांनी दिलेल्या जुन्या आश्वासनांची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून करून देणार असल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर त्यांनी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी याआधी शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत केलेल्या घोषणांचा व्हिडिओ दाखवून दिला. यामुळे आता राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस हे सुद्धा ‘लाव रे तो व्हिडिओ’ असे म्हणणार असल्याचे जवळपास स्पष्ट झालेले आहे.

Protected Content