Home क्राईम खासदार व कलावंत डॉ. अमोल कोल्हे यांना ठार मारण्याची धमकी

खासदार व कलावंत डॉ. अमोल कोल्हे यांना ठार मारण्याची धमकी

0
41


जुन्नर वृत्तसंस्था । गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या अक्षय बोऱ्हाडे आणि सत्यशील शेरकर वादंगाचे पडसाद अजूनही थांबण्याचे नाव नाही. सोशल मीडियावरून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिर्डी येथील तीन जणांवर नारायणगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

समाजमाध्यमावरील ‘देशमुख फ्रेंड सर्कल महाराष्ट्र राज्य’ या ग्रुपवर शिर्डीतील तिघांनी अर्वाच्च भाषा वापरून ‘कमेंट’ केल्या आहेत. ‘खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची पाठराखण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. डॉ. कोल्हे यांना शिर्डी येथे आल्यावर गोळ्या घालू,’ अशी धमकी देण्यात आली आहे. यावरून नारायणगाव पोलिसांनी शिर्डी येथील तिघांवर शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी; तसेच आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी डॉ. कोल्हे यांनी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. यासह नारायणगाव येथील सागर शशिकांत भुजबळ (वय ४०) यांनीही तक्रार दिली आहे.


Protected Content

Play sound