जळगाव प्रतिनिधी । जळगाव रनर्स ग्रुपच्या २०१९ टाटा ऐआयजी खान्देश रनच्या नियोजित ३ ऱ्या वर्षीच्या २४ नोव्हेंबर २०१९ रोजी होऊ घातलेल्या टाटा ऐआयजी खान्देश रनचे मेडल व टिशर्टचा अनावरण समारंभ हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज येथे मोठ्या दिमाखात पार पडला.
जळगाव रनर्स ग्रुप आयोजित खान्देश रनसाठी स्पर्धा पूर्ण केल्यानंतर आणि स्पर्धे आधी जे टीशर्ट दिले जाते त्याचे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, जिल्हा पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, मनपा आयुक्त उदय टेकाळे यांच्याहस्ते अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राजेश चोरडिया, प्रवीण फालक, मयूर शिंदे, डॉ.शिवराज मुळीक, वर्षा अडवाणी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी सुरवातीला जळगाव रनर्स ग्रुपतर्फे किरण बच्छाव यांनी मागील २ वर्षाच्या आणी या वर्षीच्या खान्देश रन बाबत सविस्तर माहिती दिली त्यानंतर जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी त्यांच्या भाषणात ४ नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या रनिंग इव्हेंटच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयतर्फे जी काही मदत लागेल ती सर्व ज्या त्या प्रशासनातर्फे दिली जाईल अशी ग्वाही दिली.त्यानंतर जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांनी व्यायामाबद्दल त्यांचे स्व अनुभव सांगितले आणि जळगाव पोलीसतर्फे ४ नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या टाटा ऐआयजी खान्देश रनसाठी पोलीस सरंक्षण तसेच इतर जी काही मदत लागेल ती पुरविण्यात येईल अशी ग्वाही दिली.
सर्वात शेवटी जळगाव महापालिकेचे आयुक्त उदय टेकाळे यांनी हि स्पर्धा मुख्यतः शहरात भरत असल्याने तिचा महापालिकेशी जास्त संबंध येतो त्या अनुशंगाने स्पर्धेच्या रुटवरील सर्व रस्ते,स्ट्रीट लाईट,स्वच्छताग्रह,रोडरस्ते सफाई,व जळगाव महापालिकेचे किमान ५० कर्मचार्याचें या स्पर्धेमध्ये मी नोंदणी करायला मदत करेल अशी ग्वाही दिली. यावर्षीचे विशेष आकर्षण म्हणून स्पर्धा पूर्ण केल्यानंतर जे मेडल स्पर्धकाला मिळते ते या वर्षीच जळगाव या नावाच्या इग्रंजी जे आद्याक्षरापासून आहे जळगाव या नावामध्ये ७ इग्रंजी आद्याक्षर आहेत त्यामुळे जळगाव रनर्स ग्रुपच्या २०१९ ते २०२५ पर्यतं जो रनर नियमित भाग घेईल त्याचे पूर्ण जळगाव हे ७ इग्रंजी आद्याक्षर असलेले मेडल पूर्ण होईल हे महत्वाचे.याप्रसंगी जळगाव रनर्स ग्रुपचे 200 सक्रीय सभासद हजर होते.
नागरीकांना आवाहन
जळगाव रनर्स ग्रुपच्या २०१९ च्या नियोजित ३ ऱ्या वर्षीच्या २४ नोव्हेंबर २०१९ रोजी होऊ घातलेल्या टाटा ऐआयजी खान्देश रन करीता ऑनलाईन नोंदणीसाठी www.jalgaonrunners.com या वेबसाईट वर जाऊन आपण खान्देश रनसाठी ३, ५, १० आणि २१ किलोमीटर साठी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे जळगाव रनर्स ग्रुपतर्फे कळविण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.तुषार चोथानी आणि प्रा.राहुल त्रिवेदी यांनी केले तसेच आभार प्रदर्शन डॉ.रवी हिरानी यांनी मानले.