Home राजकीय मोदी कधीच ‘राष्ट्रपिता’ होऊच शकत नाही – ओवैसी

मोदी कधीच ‘राष्ट्रपिता’ होऊच शकत नाही – ओवैसी

0
41

खासदार असदुद्दीन ओवेसी

हैदराबाद वृत्तसंस्था । हैदराबाद येथे झालेल्या एका पत्रकार परिषदेत एमआयएमचे नेते, खासदार असदुद्दीन ओवैसी बोलत होते. ‘मोदी कधीच ‘फादर ऑफ नेशन’ होऊ शकत नाही. त्यांची आणि गांधीजींची तुलनाच होऊ शकत नाही. ट्रम्प यांना हे माहीत असते तर त्यांनी अशी जुमलेबाजी केली नसती.

याबाबत अधिक माहिती अशी की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना त्यांना ‘राष्ट्रपिता’ अशी उपाधी देणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एमआयएमचे नेते, खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी जोरदार तोफ डागली आहे. ‘मोदी कधीच ‘फादर ऑफ नेशन’ होऊ शकत नाही. त्यांची आणि गांधीजींची तुलनाच होऊ शकत नाही. ट्रम्प यांना हे माहीत असते तर त्यांनी अशी जुमलेबाजी केली नसती. महात्मा गांधींनी हा किताब मिळवला होता. लोकांनी त्यांचा त्याग पाहून हा किताब स्वत:हून त्यांना दिला होता. पंडित नेहरू आणि सरदार पटेल हे दोघेही देशातील थोर नेते होते. पण त्यांनीही कधी कुणी ‘राष्ट्रपिता’ म्हणाले नव्हते,’ याकडंही त्यांनी लक्ष वेधलं.


Protected Content

Play sound