तिहेरी तलाक पिडित महिलेस मिळणार सहा हजार रुपये – योगी

Yogi Adityanath

 

लखनऊ वृत्तसंस्था । ज्या मुस्लिम महिलांना पतीने तिहेरी तलाक देऊन वाऱ्यावर सोडले आहे. अशा पीडित महिलांना सरकार दरवर्षी ६ हजार रुपये देणार असल्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, तिहेरी तलाक पीडित महिलांसाठी विशेष योजना बनवण्यात येणार आहे. या पीडित महिलांना जोपर्यंत न्याय मिळत नाही. तोपर्यंत सरकारकडून त्यांना प्रतिवर्ष ६ हजार रुपये दिले जाईल. एक विवाह केल्यानंतर दुसऱ्या पत्नीला ठेवणाऱ्या हिंदू पतीविरोधात सुद्धा कडक कारवाई करण्यात येईल. समाजातील कोणत्याही घटकातील व्यक्तीने स्वतःला दुःखी समजू नये, त्यांच्यासाठी सरकार अनेक चांगल्या योजना राबवणार आहे. तसेच उत्तर प्रदेशात एका वर्षात २७३ प्रकरणे समोर आले होते. त्या सर्व प्रकरणांची आम्ही गांभिर्याने नोंद घेत त्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. गृह सचिवाच्या प्रमुखांना या ठिकाणी मी मुद्दामहून बोलावले आहे. या सर्व प्रकरणात त्यांनी स्वतः लक्ष घालावे. जे पोलीस कर्मचारी या प्रकरणाकडे दुर्लक्ष करतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे आदेश दिल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

Protected Content