जळगाव, प्रतिनिधी | खान्देशचे मुख्य पिक आणि खान्देशच्या आर्थिक, औद्योगिक, सामाजिक व सांस्कृतिक विकासात मोठे योगदान असलेले केळी हे फळ हे खान्देशी समाज जीवनाचे वैभव आहे. या पिकाने अनेकांना आर्थिक संपन्नता दिली आहे. अशा या केळीच्या उत्पादनात आणि व्यापारात सध्या काही गंभीर मुद्दे उपस्थित झाले आहेत. हे मुद्दे नेमके काय आहेत ? केळी उत्पादकांसमोर वर्तमानात आणि भविष्यकाळात नेमकी कोणती आव्हाने आहेत ? त्यावर कोणत्या उपाययोजना करता येतील ? या मुद्द्यांच्या आधारे मार्गदर्शन करण्यासाठी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ने जागतिक कीर्तीचे केळीतज्ञ व जैन इरिगेशनचे व्हाईस चेअरमन डॉ.के.बी. पाटील यांना खास निमंत्रित केले आहे, ज्येष्ठ पत्रकार सुरेश उज्जैनवाल यांनी त्यांच्याशी केलेली ही सविस्तर बातचीत…