चोपडा येथे प्रथम राष्ट्रीय महाअधिवेशन

mahaadhiveshan

चोपडा प्रतिनिधी । ऑल इंडिया जैन जर्नालिस्ट असोसिएशनतर्फे अगाशी जैन तिर्थ येथे आज प्रथम राष्ट्रीय महाअधिवेशन उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, असोसिएशन राष्ट्रीय अध्यक्ष हार्दिक हुंडीया, सुनीता हुंडीया, सुप्रसिद्ध जैन तत्वचिंतक व अभ्यासक रमेश मेहता, राज्य अध्यक्ष दिलीप कावेरीया आदि मान्यवरांच्या हस्ते श्री सरस्वती वंदना व दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी जैन दादा मुनीसुरतश्वरीजी यांच्या मंदिरापर्यंत सर्व जैन पत्रकारांची हार्दिक हुंडीया यांच्या नेतृत्वाखाली वाजत गाजत शोभायात्रा काढण्यात आली. उद्घाटन समारंभात प्रदेश अध्यक्ष कावेरीया यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला. अधिवेशनात प्रथम सत्रात देशभरातून उपस्थित जैन पत्रकारांनी आपला परिचय करून दिला आणि त्यांना असोसिएशनतर्फे स्वर्ण गुलाबपुष्प देण्यात आले. द्वितीय सत्रात वसई विरार मनपाचे माजी महापौर प्रविणाबेन ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत जैन पत्रकारांच्या विविध समस्या तसेच असोसिएशनचे उपक्रमाविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.

अधिवेशन प्रसंगी राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेन्द्र मेहता (कर्नाटक), कल्पेश जैन (मलाड-महा), मीडिया प्रभारी माणकलाल भंडारी (भिलमाड), संजय जैन (झाबुआ- मध्य प्रदेश), मनोज बोथरा (छत्तीसगढ), प्रदीप पगारिया, हिमांशू जैन (उज्जेन), विमल जैन (मेवाड प्रतापगड), दिनेश जैन (तामिळनाडू), नितेश जैन (सेलम), दिनेश जैन (हैदराबाद), महेंद्र सकलेचा (औरंगाबाद) तर खान्देशातून जेष्ठ पत्रकार अनिलकुमार पालिवाल, आईजाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सद्स्य लतीश जैन, आकाश जैन आदी शेकडो पत्रकारांनी आपली उपस्थिती दिली.

Protected Content