Home Cities जळगाव सोपानदेव नगरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

सोपानदेव नगरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील सोपानदेव नगरात शुभ आरंभ फाऊंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी बी. बी. देवरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन व माल्यार्पण केले तर समाधान पानपाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाला सोपानदेव नगर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभ आरंभ फाउंडेशनचे संस्थापक चंदन जैन, अध्यक्ष विक्रांत पाटील, दर्शन काळे, शशिकांत गोरे, पवन जैन, पराग अत्तरदे, निखिल भांरबे, सागर घोबाळे, भूषण बऱ्हाटे आदींनी सहकार्य केले.


Protected Content

Play sound