Home Cities अमळनेर लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून लोखंडी टॉमीने मारहाण

लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून लोखंडी टॉमीने मारहाण


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे लहान मुलांच्या भांडणाबाबत समजविण्यासाठी गेलेल्या एकाला लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात चा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शेख अय्याज शेख सलीम (वय-४२) रा. मांडळ ता. अमळनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १२ एप्रिलरोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास लहान मुलांच्या झालेल्या भांडणाबाबत समजविण्यासाठी शेख अय्याज हे गेले. याचा राग आल्याने नसीमबी शेख रहीम, फिरोज शेख रहिमा, रईस शेख रहिम, रहिम शेख मुनिर सर्व रा. मांडळ ता. अमळनेर यांनी बेदम मारहाण करून केली. तर एकाने हातात असलेल्या लोखंडी टॉमी डोक्यात टाकून गंभीर दुखापत केली आणि जीवेठार मराण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर शेख अय्याज शेख सलीम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ भरत ईशी करीत आहे.


Protected Content

Play sound