डोंगरकठोरा जि.प.शाळेत सात्मीकरण स्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील डोंगरकठोरा येथील जिल्हा परिषदच्या मराठी मुला मुलींच्या शाळेत १२ एप्रील रोजी संपन्न झालेल्या पाढे सात्मिकरण स्पर्धा घेवून त्यात सहभागी गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

यानिमित्त विद्यार्थ्यांचे पाठे पाठ होऊन गणित विषयाची विद्यार्थ्यांमध्ये आवड व गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने केंद्र प्रमुख एम.एच.तडवी यांच्या मार्गदर्शना खाली दि १२ एप्रिल गुरुवार रोजी पाठे सात्मीकरण स्पर्धा घेण्यात आली. यात १ली साठी ५१ ते १०० अंक पाठांतर, २ री साठी बे ते सहा पाढे पाठांतर, ३ री साठी ६ ते १२ पाढे पाठांतर, ४ थी साठी १२ ते वीस पाढे पाठांतर अशी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत इयत्ता १ ली तुन श्रुती चव्हाण, स्नेहा धनगर, अजहर तडवी दुसरी इयत्तेतून डिंपल पाटील, वैष्णवी धनगर, रसिका पाटील तिसऱ्या इयत्तेतून यश वाघ, पायल राणे, आम्रपाली आढाळे चौथ्या इयत्तेतून कुंदन चव्हाण, धनश्री पाटील, चैताली धनगर या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. प्रसंगी सहभागी गुणवंत विद्यार्थ्यांना वही व पेन बक्षीस रूपाने देऊन त्यांचा उत्साह वाढविण्यात आला. यावेळी केंद्रप्रमुख एम. एच. तडवी, मुख्याध्यपिका विजया पाटील, उपशिक्षक शेखर तडवी, श्रीकांत मोटे, विक्रांत चौधरी, अर्चना कोल्हे, युनूस तडवी, कल्पना माळी, हुसेन तडवी, उर्दू शाळेचे मुख्याध्यापक इस्माईल तडवी, मुजबेन तडवी, राजू तडवी, चैताली चौधरी यांच्यासह विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थीत होते.

Protected Content