शेंदुर्णी येथे खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने महिला शिक्षकांचा सत्कार

 

शेंदूर्णी प्रतिनिधी । येथील शेंदुर्णी एज्युकेशन को-ऑप सोसायटी संचलित आचार्य गजानन रघुनाथराव गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय येथे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने महिला शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यकमात प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयातील सर्व महिला शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गरुड प्राथमिक विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका सौदामिनी गरुड यांनी व प्रा. छाया पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं. यानंतर राज्य महिला राष्ट्रवादी काँग्रेस सचिव वंदना चौधरी यांनी यांनी महिला शिक्षकांच्या सत्कार करण्याचा उद्देश व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महिलांच्या सक्षमीकरणासाठी कसा प्रयत्न करत आहे याबद्दल माहिती दिली. संस्थेचे सचिव सतीश काशीद मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे चेअरमन संजय गरुड यांनी अध्यक्षीय भाषणात खासदार पवार यांनी महिलांसाठी केलेल्या कामाची माहिती दिली. प्रमुख पाहुणे म्हणून महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सचिव वंदना चौधरी, जिल्हा परिषद सदस्य सरोजनी गरुड संस्थेच्या महिला संचालिका उज्वला काशीद संस्थेचे सचिव सतीश काशीद, शेंदुर्णी नगरपंचायतच्या नगरसेविका चंद्रभागाबाई धनगर, वृषाली गुजर, मोहसिना खाटीक ,सर्व प्राथमिक , माध्यमिक महाविद्यालयातील महिला शिक्षिका व प्राध्यापिका तसेच विद्यालयाचे प्राचार्य एस. पी. उदार, उपमुख्याध्यापक एस्. सी. चौधरी, पर्यवेक्षक आर. एस. परदेशी, सर्व महिला शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थिनी या कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित होत्या. प्रास्ताविक उपशिक्षिका पी. एस. पाटील यान्ति सूत्रसंचालन उपशिक्षिका विनिता शिंदे यांनी तर आभार उपशिक्षिका के. डी. पाटील यांनी मानले.

Protected Content