Home क्रीडा फक्त ९२ धावांमध्ये आटोपला भारताचा डाव !

फक्त ९२ धावांमध्ये आटोपला भारताचा डाव !

0
53

वेलींग्टन । बोल्टने केलेल्या भेदक मार्‍यामुळे टिम इंडियाच्या फलंदाजांनी आजच्या एकदिवसीय सामन्यात अक्षरश: हाराकिरी केली असून भारताचा डाव फक्त ९२ धावांमध्ये संपुष्टात आला आहे.

भारतीय संघाने आधीच मालिकेत ३-० अशी निर्णायक आघाडी घेत मालिका विजय निश्‍चित केला आहे. मात्र आजच्या एक दिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजांनी हाराकिरी केली. विराट व धोनीच्या अनुपस्थितीत खेळणार्‍या भारतीय संघाने साफ निराशा केली. किवीजचा वेगवान गोलंदाज टे्रंट बोल्ट याच्या भेदक मार्‍यासमोर कुणीही भारतीय फलंदाज टिकाव धरू शकला नाही. त्याने पाच बळी टिपले. यामुळे भारताचा डाव अवघ्या ९२ धावांमध्ये आटोपला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound