नागपूरात अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार

Rape Child crime

 

नागपूर (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील हिंगणा परिसरात गावाजवळील स्मशानभूमीत एका अल्पवयीन मुलीवर चौघांनी सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, रविवारी (8 सप्टेंबर) रात्री पीडित मुलगी शौचास गावाबाहेर गेली होती. तेथून परतत असताना गावातील चौघांनी तिचे अपहरण केले. त्यानंतर तिला स्मशानभूमीत नेऊन तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. नंतर तिला गावात आणून सोडले. या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अमित ठाकूर (वय-18), बलवंत गोंड (वय-22) यांच्यासह दोन मुलांवर गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी अमित ठाकूरला अटक करण्यात आली, तर बलवंत गोंड अद्याप फरार आहे. दोन आरोपी विधिसंघर्षग्रस्त मुले असल्याची माहिती मिळाली आहे.

Protected Content