मुंबई प्रतिनिधी । मराठा आरक्षण प्रकरणी याचिका दाखल करणार्यांना मागासवर्ग आयोगाचा पूर्ण अहवाल देण्याचे आदेश आज उच्च न्यायालयाने दिले.
मराठा आरक्षणाला आव्हान देणारी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. याच्या अलीकडेच झालेल्या सुनावणीत राज्य मागास प्रवर्गाने तयार केलेला मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल सादर करण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी हायकोर्टाला केली होती. मात्र, राज्य सरकारने मागास प्रवर्ग आयोगाचा संपूर्ण अहवाल जाहीर न होण्याची भूमिका मांडली होती. मात्र, आज उच्च न्यायालयाने राज्य सरकारची भूमिका फेटाळून लावत मागास प्रवर्गाचा संपूर्ण अहवाल, कोणताही भाग न वगळता याचिकादार, प्रतिवाद्यांना देण्याचे निर्देश दिले. दरम्यान, एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणाबाबत दाखल केलेली याचिका आज मागे घेतली.