चाळीसगावात विभागीय युवारंग महोत्सवास सुरुवात

चाळीसगाव प्रतिनिधी । येथे आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवाचे आज आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने चाळीसगाव महाविद्यालयाचा परिसर युवक-युवती यांच्या प्रचंड उपस्थितीने व उत्साहाने गजबजून गेला आहे.

या एरंडोल विभागीय युवारंग महोत्सवात एरंडोल धरणगाव, भडगाव, पाचोरा, जामनेर, जळगाव या ठिकाणांहून जवळपास २२ महाविद्यालयांनी सहभाग घेतला आहे. यात २७ कलाप्रकार सादर केले जाणार असल्याचे सांगितले आहे आज सकाळी नऊ वाजता या युवारंग महोत्सवाचे उदघाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव चे कुलसचिव बी.बी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे मॅनेजिंग बोर्ड चेअरमन नारायण भाऊ अग्रवाल, आमदार उन्मेशदादा पाटील यांच्या सौभाग्यवती संपदा पाटील यावेळी प्रमुख उपस्थित होत्या.

या महोत्सवात विडंबन, नाट्य, मूकनाट्य, नकला, समूह नृत्य, भारतीय लोकगीत, लोकसंगीत, सुगम गायन भारतीय, सुगम गायन पाश्‍चिमात्य, समूह गीत भारतीय, समूह लोकनाट्य, काव्यवाचन, वाद विवाद, वक्तृत्व, शास्त्रीय गायन, शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय वादन, समूहगीत शास्त्रीय, वादन तालवाद्य, व्यंगचित्र, इंस्टॉलेशन, स्पॉट पेंटिंग, रांगोळी, फोटोग्राफी, चित्रकला, कोलाज, क्ले मोडेलींग, मेहंदी, आदी कलाप्रकार रंगमंच १ ते रंगमंच ५ असे विभागून होणार आहेत.

युवारंगच्या उदघाटन समयी प्राध्यापक एस. टी. इंगळे प्राध्यापक डॉक्टर सत्यजित साळवे, नितीन बारी, दीपक बंडू पाटील, दिनेश नाईक, नितीन झाल्टे, विलास चव्हाण, प्राचार्य एस. आर. जाधव, विलास चव्हाण, डॉक्टर डी. एस. निकम, तर संस्थेचे पदाधिकारी म्हणून अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, सचिव डॉक्टर विनोद कोतकर, डॉक्टर एम. बी. पाटील, प्रदीप अहिरराव, मु. रा. अमृतकर, तर विश्‍वस्त मंडळातील मो. ह. बुंदेलखंडी, अ. वि. येवले उपस्थित होते महाविद्यालयाचे प्राचार्य मिलिंद बिल्दीकर, उपप्राचार्य प्रकाश बाविस्कर, उपप्राचार्य सलिलकुमारी मुठाणे, अजय काटे, प्राध्यापक पंकज नन्नवरे, प्राध्यापक आप्पा लोंढे , हिलाल पवार आदींनी उपस्थितांचे स्वागत केले.

Add Comment

Protected Content