मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या राज्यस्तरीय अधिवेशनची सुरुवात

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळचे ६२ वे राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशनाची जळगाव जिल्ह्यातील जे.टी.महाजन इंजीनियरिंग कॉलेज फैजपूर येथे १८  रोजी मोठया उत्साहात सुरुवात झाली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय पाटील हे होते.उद्घाटन कोकण विभाग शिक्षक आ.ज्ञानेश्वर म्हात्रे,नाशिक विभाग शिक्षक आ. किशोर दराडे यांच्या हस्ते झाले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ.जयप्रकाश बाविस्कर,तंत्र व वैदक शिक्षण मंडळ अध्यक्ष शरद  महाजन,माजी अधिवेशन अध्यक्ष सुभाष माने,यु.डी.पाटील,एल.जी बेंडाळे,चिंतामण तोरस्कार,राज्य मुख्याध्यापक महामंडळ अध्यक्ष जे.के.पाटील,माजी अधिवेशन अध्यक्ष महेंद्र गणपुले,मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव शांताराम पोखरकर,डायटचे प्राचार्य डॉ.अनिल झोपे,अधिव्याख्याता डॉ.चंद्रकांत साळुंखे,मुख्याध्यापक महामंडळाचे सर्व पदाधिकारी,जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सर्व कार्यकारिणी सदस्य,राज्यभरातुन जवळपास १४०० मुख्याध्यापक उपस्थित होते.प्रास्ताविक महामंडळ अध्यक्ष जे.के. पाटील यांनी केले.

सूत्रसंचालन आर.डी.निकम,प्रशांत वाघ,मनीषा पाटील,शेखर पाटील यांनी केले.

मान्यवरांचे मनोगत

स्वागताध्यक्ष आमदार शिरीष चौधरी- यांनी सांगितले की स्वातंत्र्यलढ्यात जिल्ह्याची महत्त्वाची कामगिरी आहे, फैजपूरला या अधिवेशनाचा मान मिळाला याबद्दल आनंद आहे.शिक्षण क्षेत्रातील बदलांना सामोरे जाण्याची जबाबदारी शिक्षकांवर आलेली आहे,शिक्षण आनंददायी बनवणे म्हणजे विद्यार्थ्यांना त्यात गोडी निर्माण होईल.शिक्षकांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवल्या जातील, शिक्षणामध्ये कृषी विषयाचा समावेश करावा.

माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर- शिक्षण क्षेत्र स्वच्छ आणि चांगले करण्यासाठी त्याचप्रमाणे जातीजातीतील भिंती दूर करण्याची व सलोखा निर्माण करण्याची जबाबदारी व कामासाठी शिक्षकांची नितांत गरज आहे.

नाशिक शिक्षक आमदार किशोर दराडे-पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा आत्मा आहे, सेवानिवृत्तांचा आत्मसन्मान आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी,अनेकांच्या म्हातारपणाची काठी म्हणजे पेन्शन म्हणूनच सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी त्यामुळे जोपर्यंत जुनी पेन्शन सुरू होणार नाही तोपर्यंत मी पेन्शन घेणार नाही, कॅशलेस मेडिकल बिल तसेच जुनी पेन्शन योजना हे महत्त्वाचे,गरजेचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करेल.

कोकण शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे- खानदेशी विशेष शैलीत बोलून आमदारांनी सुरुवात केली. मुख्याध्यापकांना सर्वांना घेऊन कामकाज करावे लागते म्हणुन आमचा मुख्याध्यापक मधुमेह व रक्तदाबची गोळी घेऊन काम करतो, त्याच्यावर खुप जबाबदार्‍या असतात.शिक्षक शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करणार तसेच शिक्षकांची व शैक्षणिक कामातून मुक्तता करण्यासाठी प्रयत्न करणार असे प्रतिपादन केले.

अध्यक्षीय भाषण विजय पाटील-“कुणी घालीन भीक तर मास्तर की शिक”असं उपरोधाने म्हटलं जायचं ही परिस्थिती बदलून “असेल धमक तर मास्तर होऊन चमक” इथपर्यंत प्रवासासाठी अनेक आंदोलन,मोर्चे, उपोषण इत्यादींच्या माध्यमातून शिक्षकांना सेवा शाश्वती मिळाली.सध्या मिळत असलेल्या वेतनेतर अनुदानाच्या सूत्रामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे,समूह शाळा दत्तक शाळा या निर्णयांचा फेरविचार करावा,नवीन शैक्षणिक धोरण पुढील वर्षापासून सुरू होणार असल्याने त्याबद्दलची अनेक प्रश्नांची उत्तरे अद्यापही स्पष्ट नसल्याने पालक,विद्यार्थी,शिक्षक,मुख्याध्यापक आणि प्रशासकीय यंत्रणा सर्वच याबाबत अनभिज्ञ आहेत.

अधिवेशनाचे प्रमुख वैशिष्ट्ये

१)तीस वर्षानंतर जळगाव जिल्ह्याला मिळाला मान

२)परिवर्तन संस्थेतर्फे अरे संसार संसार सांस्कृतिक कार्यक्रम

३)राज्यभरातून १४०० मुख्याध्यापकांचा सहभाग

४)उद्घाटनस्थळी टाकाऊ(अल्पखर्चिक) वस्तूपासुन बनविलेली आकर्षक व सुंदर सजावट(फुलांच्या पाकळ्या,देठ,खडु,केळ फुल,कापुस,लाकडाचा भुसा,रांगोळी इ.

५)मुख्याध्यापकांसाठी जेवण(खान्देशी तडका -शेव भाजी,मिक्स भाजी,भरीत पुरी मेनु )व निवासाची व्यवस्था

६)शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडून अधिवेशनासाठी एक लाख रुपये देणगी

७)शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्याकडून अधिवेशनासाठी एक लाख पन्नास हजार देणगी

विविध विषयावर प्रकाश झोत

१)नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शाळा स्तरावरील तयारी

सादर करणारे – सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ

मार्गदर्शन-डायटचे प्राचार्य डॉ.अनिल झोपे,अधिव्याख्याता डॉ.चंद्रकांत साळुंखे

२)राष्ट्र निर्माता शिक्षक आर्य चाणक्य व्याख्यान-शास्त्री भक्तीकिशोर  व सुनील पाटील

 

१९ रोजी

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर पुनर्वसन मंत्री अनिल पाटील लोकप्रतिनिधी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

राज्यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या मुख्याध्यापकांचा राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देऊन त्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जे.के.पाटील, उपाध्यक्ष बी.पी. पाटील,एस.व्ही.गीते,जी.एल.पाटील, सचिव एस.पी.भिरुड,तालुकाध्यक्ष जयंत चौधरी,जे.पी.सपकाळे,ललित चौधरीचे यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष,जळगाव पतपेढीचे अध्यक्ष एस.डी.भिरुड,गोपाळ पाटील,जे. टी.महाजन अभि. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.जी.पाटील,उपप्राचार्य डॉ.जी. इ.चौधरी यांच्यासह विविध समित्यांनी परिश्रम घेतले.

Protected Content