नवी दिल्ली प्रतिनिधी । भारताची आघाडीवरील महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. या विजयासह सिंधूचे या स्पर्धेतील रौप्यपदक पक्के झाले आहे.
सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधूने आतापर्यंत तिसऱ्यांदाच प्रवेश केला आहे. यापूर्वी झालेल्या दोन अंतिम फेऱ्यांमध्ये सिंधूला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले होते. या स्पर्धेत सिंधूच्या खात्यामध्ये आता पाच पदके झाली आहेत. सिंधूने यापूर्वी दोन रौप्यपदकसांह दोन कांस्यपदकेही पटकावली होती. आज उपांत्य फेरीत विजय मिळवत सिंधूने रौप्य पदक निश्चित केले आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सिंधूने चीनच्या चेन युफेईवर 21-07, 21-14 असा दणदणीत विजय मिळवला.