श्रीनगर विमानतळावर राहुल गांधींसह विरोधकांच्या शिष्टमंडळाला रोखले

Rahul Gandhi 710x400xt 1

 

श्रीनगर (वृत्तसंस्था) जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली निघालेल्या विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाला आज दुपारी श्रीनगर विमानतळावरच रोखण्यात आले आहे. त्यांना काश्मीरला जाऊ दिले जाणार नाहीय.

 

जम्मू काश्मीर प्रशासनाने राहुल गांधींसह इतर नेत्यांना राज्याचा दौरा न करण्याचे आवाहन केले होते. नेत्यांच्या दौऱ्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे नेत्यांनी इथे येणे टाळावे. आतापर्यंत कोणत्याही नेत्याला राज्यात प्रवेश करु दिलेला नाही,” असे जम्मू काश्मीर प्रशासनाने म्हटले होते. परंतू राहुल गांधी यांच्याशिवाय विरोधकांच्या शिष्टमंडळात काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, केसी वेणुगोपाल, सीपीएम नेते सीताराम येचुरी, जेडीयू नेते शरद यादव, द्रमुक नेते तिरुची शिवा, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेमन, सीपीआय नेते डी राजा, तृणमूल काँग्रेसचे नेते दिनेश त्रिवेदी, राजदचे मनोज झा हे आज जम्मू-काश्मीरमध्ये सहभागी झाले आहेत. जम्मू काश्मीरसाठीचे कलम 370 हटवल्यानंतर विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ पहिल्यांदाच राज्याच्या दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेणार असून तिथल्या नागरिकांचीही भेट घेणार आहेत.

Protected Content