Home Cities जळगाव जळगावकरांना दिलेला शब्द पूर्ण केला – ना. महाजन

जळगावकरांना दिलेला शब्द पूर्ण केला – ना. महाजन


na. mahajan

जळगाव, प्रतिनिधी | जळगाव शहराचा कायापालट करण्याचा शब्द आम्ही दिला होता. त्याप्रमाणे आज शहराच्या विकासासाठी व कर्जमुक्तीसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देऊन तो शब्द पूर्ण केला आहे. अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज (दि.२०) दिली.

 

ते म्हणाले की, गेल्या वर्षभरात शहरात अनेक कामांना सुरुवात झाली आहे. इतर कामांचेही लवकरच भुमीपूजन करण्यात येणार आहे. जळगाव मनपा कर्जमुक्त करण्याचे आश्वासन आम्ही दिले होते, त्यानुसार आज कर्जमुक्तीचा हा ऐतिहासिक निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. भविष्यातही जळगावच्या विकासासाठी भाजप सरकार असेच कटिबद्ध राहणार आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


Protected Content

Play sound