बोदवड रेल्वे स्थानकावर विशेष तिकिट तपासणी मोहीम

bodwad news

भुसावळ प्रतिनिधी । विभागात २० ऑगस्ट रोजी भुसावळ विभागातील बोदवड रेल्वे स्थानकावर विना-तिकीट, अयोग्य तिकिट प्रवास रोखण्यासाठी विशेष तिकीट( बस रेड)तपासणी केली.

सदर तिकीट तपासणी आज मध्य रेल्वे भुसावळ विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आर.के. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या बस रेड तपासणीत एकूण ३७ तिकिट तपासणीचे पथक, ९ रेल्वे सुरक्षा दलाचे जवान सहभागी झाले होते. यात ४०३ प्रवासी अनियमितरित्‍या प्रवास करत असल्याचे आढळले. या प्रवाशांकडून दंड म्हणून एकूण १ लाख ९० हजार १६० रु इतकी रक्कम वसूल करण्यात आली. तिकिटाविना प्रवास केल्याचे १२९ प्रकरणे, ५० हजार ३८० रु.दंड, अनियमित प्रवास २७४ प्रकरणांवर १ लाख ३९ हजार ७८० रुपये दंड आकारण्यात आले. या मोहिमेमध्ये तिकीट तपासणी पथकाचे एन.पी.पवार, हेमंत सावकारे, सी.डी.कंठे, निसार खान, अनिल खर्चे,एन.पी. अहिरवार, पी.व्ही.ठाकूर, पी.एम. पाटील, एस.एन.चौधरी, वाय.डी. पाठक, एस.एम.पुराणिक, पी.एच. पाटील, अरुण मिश्रा, दीपाली बोबडे,ज्योती निकम, एस.के.दुबे, विनय ओझा, डी.के.व्‍दिवेदी, एस.एस.जाधव, धीरज कुमार, एम.के.श्रीवास्तव, ए.एम.खान, सतीश कुमार आदी सहभागी झाले होते. कारवाईचा ससेमिरा टाळण्यासाठी प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन भुसावळ रेल्वे वाणिज्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

Protected Content