पिंप्राळ हुडकोत घरातून मुद्देमालाची चोरी

चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास : रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात एका घरातून चांदीचे दागिने आणि रोकड असा एकुण १६ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, साजेदा रईस शेख (वय-४०) रा. पिंप्राळा हुडको, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १५ जून रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून चांदीचे दानिगे, घड्याळ आणि रोकड असा एकुण १६ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार बुधवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास उघडकीला आला आहे. याबाबत साजेदा रईस शेख यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून बुधवार १५ जून रोजी सकाळी १०.३० वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय सपकाळे करीत आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!