Home Cities यावल यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी उमेश पाटील, उपसभापतीपदी पंकज चौधरी यांची...

यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी उमेश पाटील, उपसभापतीपदी पंकज चौधरी यांची सर्वांनुमते निवड

0
10

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी उमेश प्रभाकर पाटील, तर उपसभापतीपदी पंकज दिनकर चौधरी यांची ४ नोव्हेंबर रोजी सर्वांनुमते निवड करण्यात आली. संचालक मंडळाच्या सर्वसाधारण सभेत दोन्ही पदांसाठी निवड प्रक्रिया पार पडली. महायुतीच्या अंतर्गत ठरलेल्या सूत्रानुसार ही निवड करण्यात आली असून, बाजार समितीच्या नेतृत्वात नव्या पदाधिकाऱ्यांना संधी मिळाली आहे.

यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती उज्जैनसिंग भाऊलाल राजपूत आणि उपसभापती दीपक नरोत्तम चौधरी यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिल्यानंतर नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला होता. महायुतीच्या निर्णयानुसार सर्व घटकांना सभापतीपदाचा सन्मान मिळण्याची समान संधी मिळावी, या उद्देशाने त्यांनी राजीनामे दिले होते.

४ नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता बाजार समितीच्या सभागृहात निवड प्रक्रिया पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यासी अधिकारी कुणाल सोनार होते. बाजार समितीचे सचिव स्वप्नील सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संचालक मंडळाची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेत सभापतीपदी उमेश प्रभाकर पाटील आणि उपसभापतीपदी पंकज दिनकर चौधरी यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

यावल कृषी उत्पन्न बाजार समितीवर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या महायुतीचे १९ संचालकांचे बहुमत आहे. नव्या पदाधिकाऱ्यांच्या नावांबाबत ४ नोव्हेंबर रोजी भालोद येथे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाचे पदाधिकारी आणि संचालक मंडळाची बैठक झाली होती. या बैठकीत उमेश पाटील आणि पंकज चौधरी यांच्या नावांवर सहमती निश्चित करण्यात आली होती.

निवडीनंतर बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून शेतकरी, व्यापारी आणि बाजार समितीच्या कामकाजाशी संबंधित घटकांच्या हितासाठी प्रभावीपणे कामकाज केले जाण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. नव्या नेतृत्वामुळे बाजार समितीच्या प्रशासनाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. या सभेला मावळते सभापती उज्जैनसिंग राजपूत, मावळते उपसभापती दीपक चौधरी, संचालक नारायण चौधरी, हर्षल पाटील, उमेश पाटील, राकेश फेगडे, पंकज चौधरी, बबलू कोळी, कांचन फालक, राखी बऱ्हाटे, सागर महाजन, अशोक चौधरी, सूर्यभान पाटील, विलास पाटील, संजय पाटील, सुनील बारी, स्वीटी बेंडाळे आणि डॉ. निलेश गडे यांच्यासह संचालक उपस्थित होते. भाजपाचे जेष्ठ पदधिकारी हिरालाल चौधरी ,विलास चौधरी , माजी जिल्हा परिषद सदस्य सविता अतुल भालेराव ,नगरसेवक उमेश फेगडे , नगरसेवक हेमराज उर्फ बाळू फेगडे, नगरसेवक योगेश चौधरी, शिवसेना शिंदे गटाचे खरेदी विक्री संघाचे संचालक मुन्ना पाटील, अतुल भालेराव यांच्यासह विविध पदाधिकारी यांनी नुतन सभापती व उपसभापती यांचे स्वागत सत्कार केले .


Protected Content

Play sound