Home Cities जळगाव नशिराबाद येथील श्रीराम मंदिरात ११०० दिव्यांचा भव्य दीपोत्सव ; पंतप्रधान मोदींचा वाढदिवस...

नशिराबाद येथील श्रीराम मंदिरात ११०० दिव्यांचा भव्य दीपोत्सव ; पंतप्रधान मोदींचा वाढदिवस उत्साहात साजरा

0
16


नशिराबाद- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टी नशिराबादच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ऐतिहासिक श्रीराम मंदिरात ११०० दिव्यांची रोषणाई करत भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. या शेकडो दिव्यांच्या दिव्य आणि नयनरम्य प्रकाशाने संपूर्ण श्रीराम मंदिर परिसर उजळून निघाला होता.

या विशेष कार्यक्रमास जळगाव जिल्ह्याच्या खासदार स्मिता वाघ यांनी भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला व वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यानंतर भाजप जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाची भक्तिभावाने महाआरती संपन्न झाली. या दीपोत्सवामुळे मंदिर परिसरात अत्यंत प्रसन्न आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

याप्रसंगी नशिराबाद नगरपरिषदेचे नगराध्यक्ष योगेश पाटील, सभापती कीर्तीकांत चौबे, नगरसेवक लालचंद पाटील, नगरसेवक मनोज पाटील, नगरसेविका जनाबाई रंधे, नगरसेविका सुवर्णा महाजन, नगरसेवक प्रदीप बोडरे, तसेच भाजप पदाधिकारी मिलिंद चौधरी, गोपाळ भंगाळे यांच्यासह भाजपचे लोकप्रतिनिधी, इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत प्रभू श्रीरामाच्या चरणी प्रार्थना केली. दिव्यांच्या मनमोहक आरासमुळे व महाआरतीमुळे नशिराबाद शहरातील नागरिकांनी या उपक्रमाचे मोठे कौतुक केले. संपूर्ण दीपोत्सव कार्यक्रमादरम्यान स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह व आनंद पाहायला मिळाला, ज्यामुळे शहरात सणासारखे वातावरण निर्माण झाले होते.


Protected Content

Play sound