Home Cities पारोळा कोळपिंप्रीचा सुपुत्र शहीद ; आर्मी पॅरा कमांडो रोहित नारायण काटे यांना वीरमरण

कोळपिंप्रीचा सुपुत्र शहीद ; आर्मी पॅरा कमांडो रोहित नारायण काटे यांना वीरमरण

0
19


कोळपिंप्री (ता. पारोळा)-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील कोळपिंप्री गावावर शोककळा पसरली आहे. येथील रहिवासी आणि भारतीय लष्करातील पॅरा कमांडो जवान रोहित नारायण काटे यांना कर्तव्य बजावत असताना वीरमरण प्राप्त झाले. हरियाणा येथे सेवेत असताना त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.

रोहित नारायण काटे हे भारतीय लष्कराच्या पॅरा कमांडो दलात कार्यरत होते. देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले. त्यांच्या निधनाची बातमी कोळपिंप्री गावात पोहोचताच ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली. देशाच्या सेवेसाठी आपल्या कुटुंबापासून दूर राहून कर्तव्य बजावणाऱ्या जवानाच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रोहित काटे हे वानखेडे परिवारातील श्री. शिवाजी सीताराम पाटील यांचे जावई असल्याची माहिती आहे. त्यांच्या निधनामुळे काटे तसेच वानखेडे-पाटील परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांकडून कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करण्यात येत आहेत.

रोहित काटे यांच्या पार्थिवावर कोळपिंप्री येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांची अंतिम यात्रा ४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता त्यांच्या राहत्या घरापासून, कोळपिंप्री येथून निघणार आहे. या अंतिम यात्रेला ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून वीर जवानाला अखेरचा निरोप देणार आहेत. भारतीय लष्करात पॅरा कमांडो म्हणून सेवा बजावताना रोहित काटे यांनी देशसेवेला सर्वोच्च स्थान दिले. त्यांच्या वीरमरणामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा प्रसंग ओढवला असला, तरी त्यांच्या देशसेवेचा आणि त्यागाचा संपूर्ण कोळपिंप्री गावाला अभिमान राहणार आहे.

 


Protected Content

Play sound