Home क्रीडा JBCL Season 3: आयटी डिजिटेक सोल्यूशन्स संघाचा अंतिम सामन्यात दिमाखदार विजय ;...

JBCL Season 3: आयटी डिजिटेक सोल्यूशन्स संघाचा अंतिम सामन्यात दिमाखदार विजय ; इलेक्ट्रिक स्कूटी आणि चषकावर कोरले नाव!

0
23


जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव बॉक्स क्रिकेट लीग (JBCL) हॅटट्रिक ठरलेल्या तिसऱ्या हंगामाचा अंतिम सामना अत्यंत उत्साहपूर्ण आणि रोमांचक वातावरणात पार पडला. या अंतिम लढतीत आयटी डिजिटेक सोल्यूशन्स (IT DigiTech Solutions) संघाने उत्कृष्ट सांघिक कामगिरीचे प्रदर्शन करत जेबीसीएल (JBCL Season 3) च्या विजेतेपदावर आपले नाव कोरले.

आयटी डिजिटेक सोल्यूशन्स संघाचे मालक अक्षय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कर्णधार मिहिर अडवाणी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली संघाने संपूर्ण स्पर्धेत आपली पकड मजबूत ठेवली होती. अंतिम सामन्यात उत्कृष्ट खेळ दाखवत संघाने दणदणीत विजय मिळवला. प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या आयटी डिजिटेक सोल्यूशन्स संघाला रोख २५,५५५ रुपये आणि आकर्षक इलेक्ट्रिक स्कूटी देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेत एम. डी. झाहिद मालकी आणि मयूर कोळी यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या झॅक भुसावळ (ZACC Bhusawal) संघाने उपविजेतेपद पटकावले. त्यांना १५,५५५ रुपये रोख व स्मार्ट टीव्ही देऊन सन्मानित करण्यात आले. तर शिबान बागवान मालकी आणि आयुष मदानी यांच्या नेतृत्वाखालील रॉयल मोबाईल (Royal Mobile) संघाने तिसरा क्रमांक मिळवत ७,५५५ रुपये रोख व सायकल हे पारितोषिक प्राप्त केले.

स्पर्धेतील वैयक्तिक चमकदार कामगिरीबद्दल उत्कृष्ट खेळाडूंना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यामध्ये मयूर कोळी यांना मालिकावीर (Man of the Series) पुरस्काराने गौरवण्यात आले. याशिवाय शाहरुख पटेल यांना सर्वोत्कृष्ट फलंदाज, लक्ष विश्राणी यांना सर्वोत्कृष्ट गोलंदाज, तर साहिल पाटील यांना सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून बहुमान मिळाला. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व स्पॉन्सर्स, संघमालक, खेळाडू, कर्णधार आणि आयोजकांचे मोलाचे सहकार्य लाभले. अंतिम सामन्याप्रसंगी क्रिकेटप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. खेळाडूंनी दाखवलेली क्रीडाभावना आणि प्रेक्षकांचा मिळालेला भरघोस प्रतिसाद यामुळे यंदाचा हंगाम अभूतपूर्व यशस्वी ठरला असून जेबीसीएल परिवारातर्फे सर्वांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.


Protected Content

Play sound