Home आरोग्य पारोळ्यात भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; ६६ हून अधिक रक्तदात्यांनी केले...

पारोळ्यात भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; ६६ हून अधिक रक्तदात्यांनी केले रक्तदान

0
17

पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कै. बिपिनचंद्र माधवराव खरे यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त पारोळा शहरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पाटील हॉस्पिटल येथे झालेल्या या सामाजिक उपक्रमात ६६ हून अधिक रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली. गरजू रुग्णांसाठी रक्ताचा साठा उपलब्ध व्हावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत व कौतुक करण्यात आले.

शहरातील पाटील हॉस्पिटल येथे डॉ. मिताली पाटील व डॉ. धीरज पाटील (संचालक – साईचित्र दातांचा दवाखाना) यांच्या संकल्पनेतून रोटरी क्लब पारोळा, उमंग फाउंडेशन पारोळा आणि केमिस्ट असोसिएशन पारोळा यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी जपत मोठ्या संख्येने नागरिकांनी रक्तदानासाठी सहभाग नोंदविला. रक्तदान शिबिराचे उद्घाटन उपनगराध्यक्ष रोहन मोरे, नगरसेविका मंगलाबाई सुदाम चौधरी तसेच रोटरी क्लब पारोळाचे अध्यक्ष सुरेंद्रभाऊ बोहरा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत, “रक्तदान हेच श्रेष्ठ दान असून अशा उपक्रमांमुळे गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होते. भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे सातत्य राखले जाईल,” असा विश्वास व्यक्त केला. या शिबिरात ६६ हून अधिक रक्तदात्यांनी उत्साहाने रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांचा प्रमाणपत्र आणि पाण्याचा जार भेट देऊन गौरव करण्यात आला. रक्तदात्यांच्या सहभागामुळे समाजात रक्तदानाविषयी सकारात्मक जनजागृती होण्यास मोठी मदत झाल्याचे आयोजकांनी सांगितले.

कार्यक्रमात डॉ. संकेत खरे, डॉ. मिताली पाटील, डॉ. धीरज पाटील, सुरेंद्रभाऊ बोहरा, डॉ. सचिन बडगुजर, जगदीश आफ्रे, मुकेशभाई गुजराती, गणेश बिचवे, शरद वाणी, बी. जी. पाटील, विशाल पाटील, सचिन पाटील, अमित हिंदूजा, भाऊ शिरोळे, अमोल वाणी, पराग शिरसमणे तसेच श्री छत्रपती शिवाजी व्यायाम शाळेचे योगेश चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उमंग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सचिन बडगुजर यांनी रक्तदाते, मान्यवर, सहकारी संस्था तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार मानले. साईचित्र दातांचा दवाखाना आणि पाटील हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य केले.


Protected Content

Play sound