Home Cities मुक्ताईनगर मुक्ताईनगर बस आगारात ५ नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसांचे लोकार्पण

मुक्ताईनगर बस आगारात ५ नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसांचे लोकार्पण

0
3

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी देणारा महत्त्वपूर्ण टप्पा रविवारी गाठण्यात आला. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मुक्ताईनगर बस आगारात नव्याने दाखल झालेल्या ५ ‘राजमाता जिजाऊ’ बसांचे लोकार्पण आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या नवीन बसांमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवासाचा अनुभव मिळणार असून परिसरातील वाहतूक सेवेतही मोठी सुधारणा होणार आहे.

रविवार, २६ जुलै रोजी आयोजित कार्यक्रमात नव्या बसांचे विधिवत पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर या बस प्रवाशांच्या सेवेसाठी समर्पित करण्यात आल्या. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुक्ताईनगर बस आगारासाठी नवीन बस उपलब्ध करून देण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करत ५ ‘राजमाता जिजाऊ’ बस आगाराला देण्यात आल्या. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवीन बसांमुळे मुक्ताईनगरसह ग्रामीण भागातील प्रवाशांना अधिक विश्वासार्ह, सुरक्षित आणि सुखकर प्रवासाची सुविधा मिळणार आहे. जुन्या बसांवरील ताण कमी होण्यास मदत होणार असून एसटी सेवेची गुणवत्ता वाढण्यासही या बस उपयुक्त ठरणार आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी, महिला, शेतकरी, नोकरदार आणि ज्येष्ठ नागरिकांना या सुविधेचा मोठा लाभ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. लोकार्पण सोहळ्यास शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी नवीन बसांचे स्वागत करत शासन आणि परिवहन विभागाचे आभार व्यक्त केले.


Protected Content

Play sound