Home आरोग्य ग्रीनॅथॉन सीझन-६ : ‘मिशन ओटू’ व खामगाव नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण...

ग्रीनॅथॉन सीझन-६ : ‘मिशन ओटू’ व खामगाव नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण जनजागृतीसाठी ग्रीन रन

0
1

खामगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘मिशन ओटू’ आणि खामगाव नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (२६ जुलै) ग्रीनॅथॉन सीझन-६ चे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ६.३० वाजता सुरू होणाऱ्या या उपक्रमात ४.५ किलोमीटरची ग्रीन रन आयोजित करण्यात आली असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि कमी होत चाललेले हरित क्षेत्र यामुळे पर्यावरण संवर्धनाची गरज अधिक महत्त्वाची बनली आहे. याच पार्श्वभूमीवर धावण्यासोबत वृक्षारोपण, स्वच्छता आणि हरित जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्लास्टिक सर्जन व समाजसेवक डॉ. विठ्ठल लहाने यांचे प्रेरणादायी व्याख्यान. ते ‘एका संधीची गोष्ट’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. ग्रीनॅथॉनची सुरुवात खामगाव नगर परिषद गेट येथून होऊन समारोप गणेश घाट, जगदंबा तलाव येथे होणार आहे.

स्पर्धेतील सहभागींसाठी आकर्षक टी-शर्ट, एनर्जी ड्रिंक, पिण्याचे पाणी, अल्पोपहार, सहभाग प्रमाणपत्र तसेच वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. विजेत्यांना रोख पारितोषिके, ट्रॉफी आणि पदके देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क २०० रुपये असून १२ ते ६० वर्षे वयोगटातील इच्छुकांना सहभाग घेता येणार आहे. नावनोंदणी साई डेंटल क्लिनिक, नॅशनल शाळेसमोर, खामगाव येथे सुरू असून, नागरिकांनी या पर्यावरणपूरक उपक्रमात सहभागी होऊन खामगाव अधिक हिरवेगार करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 


Protected Content

Play sound